वीजडम इंग्लिश स्कूल सांगवी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:

प्रतिनिधीवीजडम इंग्लिश स्कूल, सांगवी नांदेड येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी माजी सैनिक तथा CRPF जवान श्री. प्रभाकर कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रकाश आवडे, पोलीस उपनिरीक्षक, तसेच शाळेचे संचालक श्री. राजकुमार घोडके सर, श्री. करण सारथी सर, राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशचे मराठवाडा सचिव तथा भारत राष्ट्र समितीचे श्री. प्रदीपकुमार जैन, श्री. सतीश भाऊ नरवाडे, श्री. प्रशांत पवार यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे केली आणि देशभक्ती गीतांवर सुंदर नृत्य सादर करून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला.यावेळी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये पार पडलेल्या अबॅकस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करत मान्यवरांनी त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात देशभक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे संचालक, शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!