पि.एम.श्री.जि.प.प्रा.शाळा सरसम (बु.)च्या विद्यार्थ्यांची निसर्गरम्य वातावरणात क्षेत्रभेट

हिमायतनगर : देवानंद गुंडेकर सरसमकर

हिमायतनगर तालुक्यातील पि.एम.श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सरसम (बु.) येथील सर्व विद्यार्थ्यांची निसर्गरम्य वातावरणात आनंददायी क्षेत्रभेटीचे आयोजित करण्यात आले होते. या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी पोटा व सोनारी दरम्यान डोंगरावर असलेल्या महादेव मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले.


निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच आनंददायी अनुभव मिळावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सहलीत विद्यार्थ्यांनी परिसरातील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी दोन विद्यार्थ्यांचे वाढदिवसही निसर्गरम्य वातावरणात उत्साहात साजरे करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे वनभोजनाचा आस्वाद घेतला.


डोंगररांग, हिरवाई आणि शांत वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शाळेच्या नियमित शैक्षणिक उपक्रमांबरोबरच अशा क्षेत्रभेटींमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून निसर्ग, पर्यावरण आणि सामाजिक मूल्यांची जाणीव होते, तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळते.


या क्षेत्रभेटीत शाळेचे मुख्याध्यापक गणेश कोकुलवार सर, तसेच कोटगीरे सर, घाळपा सर, खंदारे सर, वाडकर सर, चव्हाण सर, बोंगाळे मॅडम, सुलफुले मॅडम, पवार मॅडम, व्यवहारे मॅडम यांच्यासह शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.


विद्यार्थ्यांनी या सहलीदरम्यान निसर्गाच्या सानिध्यात आनंदमय वातावरणाचा अनुभव घेतला. त्यामुळे ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!