मौजे सरसम बु येथील शेतकऱ्यांचा शासनाविरोधात संताप — अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होऊनही मदत न मिळाल्याने दिला आंदोलनाचा इशारा..

हिमायतनगर प्रतिनिधी –

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, या नुकसानानंतरही शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे शासनाला तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

मौजे सरसम बू येथील 30 टक्के ते 40 टक्के शेतकऱ्यांचे, वारंवार पंचनामे होऊनही मदतीचा एक रुपया सुद्धा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून पुढील हंगामासाठी बी-बियाणे, खत यांचीही व्यवस्था करणे कठीण झाले आहे.

या निवेदनावेळी शेतकरी साहेबराव भाऊराव गाडे, लक्ष्मण नारायण कदम, साईनाथ हिरामण मोरे, जयश हिरामण मोरे, साईनाथ नरसिंगा जिट्टेवार, उत्तम पोषटी मंडलवाड, संजय आडेलू मंडलवाड, रमेश आबाजी गायकवाड, गोविंद देवराव गोडसेलवार, बालाजी विठ्ठल मोरे, नेमाजी बोले तसेच इतर अनेक शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर लवकरात लवकर नुकसान भरपाई व मदतीबाबत ठोस निर्णय घेतला गेला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!