जि.प. प्राथमिक शाळा कारला (प) येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

हिमायतनगर:- देवानंद गुंडेकर सरसमकर

आज दि. 15 जून 2026 रोजी हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारला (प) येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळेत प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात करण्यात आली.


प्रवेशोत्सवानिमित्त शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत नियमित शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचे महत्त्व पटवून दिले. नव्या विद्यार्थ्यांच्या आगमनामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.


या कार्यक्रमास मुख्याध्यापिका श्रीमती बोईले ए. पी., श्रीमती शिनगारे आर. एम., श्री धनुष्कर एस. ए., श्रीमती उमाटे ए. आर. यांच्यासह पालक वर्ग उपस्थित होता. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण करण्याबरोबरच शाळेशी त्यांचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!