हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-
हिमायतनगर तालुक्यातील वारंग टाकळी परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली असून शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. वारंगटाकळी येथील शेतकरी अशोक लक्ष्मण हाके यांच्या शेतात 19 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 8 ते 9 दरम्यान बिबट्याने म्हशीवर अचानक हल्ला करून तिला ठार केले.
या हल्ल्यामुळे शेतकरी हाके यांचे अंदाजे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांला 50 हजार रुपये नुकसान भरपाई प्रशासनाने त्वरित द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांने आणि ग्रामस्थांनी केली आहे.
या घटनेनंतर वारंग टाकळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी वनविभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.यावेळी वनविभागाच्या पथकाचे वनपाल कदम व वनरक्षक यमजलवाड सह पशुवैद्यकीय तालुका अधिकारी यवतीकर यांनी घटनास्थळी येऊन तपास केला.
