हिमायतनगर तालुका प्रतिनिधी –
जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना उभाटा गटाकडून सभापती पदासाठी दावेदारी करण्याची हालचाल सुरू झाली आहे. खासदार नागेश पाटील अष्टेकर यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारे सरसम बु येथील ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन पेंटेवाड यांच्या पत्नी सौ. पद्मावती गजानन पेंटेवाड या इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत.
स्थानिक पातळीवर समाजसेवा, महिला बचत गटांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. पद्मावती पेंटेवाड यांचा जनसंपर्क चांगला असून, शिवसेना उभाटा गटाच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे.
खासदार नागेश पाटील अष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या पद्मावती पेंटेवाड यांच्या उमेदवारीला सरसम बु परिसरातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर या दावेदारीला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
येत्या काही दिवसांत या दावेदारीवर अंतिम निर्णय होणार असून, जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना उभाटा गटाची ताकद दाखवण्यासाठी पद्मावती पेंटेवाड या सक्षम उमेदवार ठरतील, अशी चर्चा पक्षात सुरू आहे.
