हिमायतनगर येथे भाजपा तालुका संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

हिमायतनगर प्रतिनिधी –

आज भारतीय जनता पार्टीच्या तालुका संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार श्री अशोकरावजी चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

या प्रसंगी श्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी उपस्थित जनसमुदायाला आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी श्री परमेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन मंदिर समितीशी संवाद साधला.

या कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस श्री मुसळेजी, श्री भिलवंडे साहेब, हदगाव तालुका अध्यक्ष भागवतजी देवसरकर, सुरेशभाऊ सारडा, सुप्रियाताई मुनेश्वर, हिमायतनगर तालुका अध्यक्ष गजानन चायल, विपुल दंडेवाड, नागेश शिंदे, बालाजी मंडलवाड तसेच सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, तालुका व शहर कार्यकारिणी सदस्य, महिला मोर्चा, युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!