हिमायतनगर नगरपंचायत विकासात्मक मुद्द्यावर लढवणार..भावी नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार अमोल जोगदंड

हिमायतनगर प्रतिनिधी:-

शहरातील आगामी निवडणुकांचा माहोल चांगलाच रंगत असून भावी नगराध्यक्ष पदाचे दावेदार अमोल चंद्रकांत जोगदंड यांच्या जनसंपर्क मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विकास, नेतृत्व, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी यांसारख्या मुद्द्यांवर आधारित प्रभावी घोषणा आणि संदेशांमुळे ही मोहीम विशेष चर्चेत आहे.

जोगदंड यांनी शहराच्या सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य देत “नेतृत्व म्हणजे लोकांच्या आशा जागृत करणं” आणि “कर्तृत्वच बोलतं, तुम्ही फक्त साथ द्या” अशा प्रेरणादायी घोषणांद्वारे जनतेशी थेट संवाद साधला आहे. शहर विकासाला केंद्रस्थानी ठेवत “भावी नगराध्यक्षांचे एकच ध्येय, शहर विकास हेच श्रेय” आणि “शहर विकासाचा ध्यास, पूर्ण करण्याचा विश्वास” या संदेशांद्वारे त्यांनी विकासाचे स्पष्ट व्हिजन पुढे ठेवले.

सामाजिक समानता, स्वच्छता आणि नागरिकांच्या सहभागावर भर देणाऱ्या घोषणांनादेखील नागरिकांनी दाद दिली. “समानतेचा विचार, सर्वांना सोबत घेऊन विकास”, “स्वच्छ शहर, सुंदर शहर, हेच आमचे व्हिजन” तसेच “आपला माणूस, आपली साथ, शहराच्या विकासाची करू सुरुवात” या घोषणांनी मोहिमेला सर्वसमावेशक दिशा मिळाली.

ग्रामीण भागातही त्यांची छाप उमटताना दिसत असून, “गाव तिथे एकच नाव – अमोल चंद्रकांत जोगदंड” ही घोषणा विशेष लोकप्रिय होत आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी “जनतेच्या मनात, विकासाच्या पक्षात” आणि “जनतेचा कौल, विकासाचा बोल” अशा शब्दांत समर्थन दर्शवले.

याचबरोबर, सर्वांचे लक्ष वेधून घेणारी प्रभावी घोषणा—
“आता नाही, कधीच नाही, भावी नगराध्यक्ष अमोल चंद्रकांत जोगदंड यांच्याशिवाय पर्याय नाही”
—मोहिमेची जोरदार बाजू अधोरेखित करत आहे.

जोगदंड यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, “राजकारण ही संधी नसून जबाबदारी आहे, ती प्रामाणिकपणे निभावणार”, असे सांगत त्यांनी पारदर्शक, प्रामाणिक आणि विकासाभिमुख कामकाजाचे आश्वासन दिले.

शहरात उत्साहाचे वातावरण असून, आगामी निवडणुका तापत चालल्या आहेत. नागरिकांच्या वाढत्या सहभागामुळे ही मोहीम आणखी बळ मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!