हिमायतनगर प्रतिनिधी:-
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा पवार गट)ची भव्य जाहिर सभा आज हिमायतनगर येथे उत्साहात संपन्न झाली. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित या सभेला मराठवाड्यातील लाडके नेते तथा लोहा–कंधार विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीने विशेष ऊर्जित वातावरण लाभले.
यावेळी बोलताना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले की, नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय मिळाला तर मागील 25 वर्षांपासून जनतेची प्रलंबित असलेली कामे प्राधान्याने हाती घेऊन मार्गी लावली जातील. घरकुल योजना, रस्ते बांधकाम अशा मुलभूत सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
भावी नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोहम्मद जावेद भाई गन्नी यांनी भाषणात सांगितले की, “पाच वर्षे जनतेचा सेवक म्हणून कार्य करणे, हीच माझी प्राथमिकता असेल.”
या सभेला एकनाथ पाटील बोरगांवकर, बाळासाहेब रावनगावकर, माजी आमदार अविनाश घाटे, तालुका अध्यक्ष वामन मिराशे पाटील, शहराध्यक्ष अमोल धुमाळे, अभिषेक लुटे तसेच नगरपंचायत सदस्यपदाचे सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
