डॉ.राजेंद्र वानखेडे यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची हिमायतनगरात जाहीर सभा..

हिमायतनगर / प्रतिनिधी : राम चिंतलवाड

हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर हिमायतनगरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. राजेंद्र वानखेडे तसेच सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक व माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही सभा दि. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्री परमेश्वर मंदिराजवळील बस स्थानक परिसरात पार पडणार असून कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

या जाहीर सभेला मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचाराला वेग मिळवून देण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

भव्य सभा यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात येत असून, प्रचाराला आता जोरदार सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!