हिमायतनगर प्रतिनिधी:-
आगामी नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक 13 मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कार्यकर्ते रहीम खान यांच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. मागील दोन निवडणुकांत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले खान यावेळी अधिक मजबूत तयारीसह मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात असून स्थानिक पातळीवर मतदारांमध्ये त्यांच्या नावाबाबत उत्सुकता वाढताना दिसत आहे.
स्थानिक समस्यांवर लक्ष देणे, गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न आणि सातत्याने जनसंपर्क ठेवणे यामुळे रहीम खान यांनी गेल्या काही वर्षांत वार्डातील नागरिकांमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. राशनकार्ड, निराधार निवृत्ती योजना, तसेच इतर नागरी तक्रारी सोडवण्यामध्ये त्यांनी भूमिका बजावल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
मागील पोटनिवडणुकीत अल्प मतांनी संधी हुकली असली तरी दहा वर्षांत रहिम खान यांनी दाखवलेल्या सक्रियतेमुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांची ताकद वाढल्याचे स्थानिक राजकीय जाणकारांचे मत आहे. वार्ड 13 मध्ये त्यांच्या नावाभोवती निर्माण झालेली चर्चा हेच संकेत असल्याचे चित्र दिसत आहे.
नगरपंचायत निवडणुक जसजशी जवळ येत आहे. तसतसे या चर्चेला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात नगराध्यक्ष होण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तवली जात आहे.
