एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूल, सहस्त्रकुंडीच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय सांस्कृतिक ज्ञान-कला उत्सवात दैदीप्यमान यश..

किनवट प्रतिनिधी:-

नाशिक येथील राष्ट्रीय आदिवासी शिक्षा छात्र समिती, दिल्लीतर्फे आयोजित राज्यस्तरीय ज्ञान-कला उत्सव 2025 नाशिक येथील हेरिटेज स्कूलमध्ये 29 व 30 नोव्हेंबर रोजी पार पडला. सहस्त्रकुंड येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्सीयल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाक्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत चमकदार यश संपादन केले.

तालवाद्य वादन प्रकारात यश ढोले (इयत्ता ११ वी) याने राज्यातील प्रथम क्रमांक पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यशची आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय कला उत्सवासाठी महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.

आदिवासी पेंटिंगमध्ये दिव्या वंजारे (इयत्ता ७ वी) हिने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला.तर पारंपरिक कथाकथन प्रकारात श्रेया वानोळे व आकाश वागतकर यांनी तृतीय क्रमांक मिळवत आपली कला सादर केली.

या स्पर्धेत शाळेतील आकाश वागतकर, श्रेया वानोळे, दिव्या वंजारे, यश ढोले, आरुषी भिसे, आरुष्या भिसे, तनुजा खोकले, नीतीजा बुरकुले आदी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारांत सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी विद्यालयातील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तालवाद्य वादन: संगीत शिक्षक ज्ञानेश्वर शंकर डांगे आदिवासी पेंटिंग: कला शिक्षिका अपर्णा मिश्रा,पारंपरिक कथाकथन: शिक्षक प्रिन्स मान व मंतशा बरीरा,भक्ती गीत प्रस्तुती: अध्यापिका दीक्षा सिंघ, विद्यार्थ्यांच्या या यशात विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती राधिका राजीव गोलटकर यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन तसेच सर्व आवश्यक सुविधा पुरविण्याचा मोठा वाटा आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

आदिवासी राज्य आयुक्त श्रीमती लीना बनसोड, अपर आदिवासी आयुक्त अमरावती जितेंद्र चौधरी, तसेच किनवट प्रकल्प अधिकारी जेनीत चंद्रा दोंतुला यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यास शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश शाळेच्या प्रगतीत आणखी एक मोलाची भर घालणारे ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!