हिमायतनगर तालुक्यातील सोनारी परिसरात अवैध मुरूम उत्खनन; प्रशासनाची मूक सहमती..

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-

हिमायतनगर तालुक्यातील सोनारी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या बाबत स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांना माहिती दिली असता, संबंधित उत्खननाची रॉयल्टी पूर्वी भरलेली होती, मात्र सध्या तिची वैधता संपली असल्याचे उत्तर देण्यात आले.

असे असतानाही परिसरात भरमसाठ मुरूम उत्खनन सुरूच असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या आरोपानुसार, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मूक सहमतीनेच हे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. असा नागरिकाकडून आरोप केला जात आहे. रोडचे काम करणाऱ्या ठेकेदारामार्फत जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात मुरूम काढून रस्त्याच्या कामात वापर केला जात आहे.

गौन खनिज अधिनियमाला फाटा देत 10 फूटांपेक्षा अधिक खोल खोदकाम करण्यात येत असून, हायवेच्या साह्याने मुरूमची वाहतूक सुरू आहे.
विशेष म्हणजे ही अवैध वाहतूक रात्रीच्या अंधारात सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या गंभीर बाबीकडे स्थानिक तलाठी व मंडळ कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एका शेतकऱ्याच्या शेतातून हजारो रुपयांचे मुरूम काढण्यात आल्याचेही नागरिकांनी सांगितले.

या बेकायदेशीर उत्खननामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून पर्यावरणाचेही नुकसान होत आहे. त्यामुळे या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!