हिमायतनगर :- देवानंद गुंडेकर
हिमायतनगर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबुब यांचा पदग्रहण समारंभ गुरुवार, दि. ८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयात संपन्न होणार आहे. या सोहळ्यास हिमायतनगर–हदगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. माधवराव पाटील जवळगांवकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
हा कार्यक्रम मा. आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार पल्लवी टेमकर, पोलीस निरीक्षक अमोल भगत उपस्थित राहणार आहेत.
या सोबतच काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, डॉ. प्रकाश वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषदादा राठोड, ज्ञानेश्वर शिंदे, शहर अध्यक्ष संजय माने, सभापती जनार्दन ताडेवाड तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेतून जनतेच्या विश्वासावर आणि प्रेमावर भक्कम विजय संपादन करून नगरपंचायतीचे नेतृत्व स्वीकारणारे शेख रफिक शेख महेबुब यांच्या पदग्रहणामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पदग्रहणासोबतच हिमायतनगरच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याने हा दिवस शहरवासीयांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व नागरिक, हितचिंतक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
