नापिकी आणि कर्जामुळे जवळगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या.

हिमायतनगर प्रतिनिधी/-


सतत होणारी नापिकी आणि कर्जबाजारी पणास कंटाळून जवळगाव येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव सारख्या सदन भागात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आत्महत्येचे लोण वाढल्यामुळे तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

तालुक्यातील मोदी जवळगाव येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव शिवाजी केरबाजी बासरकर वय( ४९ )असे आहे. रविवारी दुपारी त्यांच्या शेतामध्ये विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली, मयत शिवाजी बासरकर यांची १ एकर शेती असून या अल्पशेतीवरच आपल्या कुटुंबाचा गाडा ओढण्याचे काम ते करीत होते. परंतु गेल्या काही दिवसापासून, शेतमालाला हमीभाव नाही, राष्ट्रीयकृत बँकांच्या वसूलीचा तगादा आदी अनेक सावकारी अडचणींमुळे आर्थिक अडचणी जाणवत होती या सर्व कर्जाची परतफेड कशी करायची या तणावातून त्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले त्यामुळे त्या शेतकऱ्यांस नांदेड येथील शासकीय रुग्णालया पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. यानंतर शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला. मयत बासरकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे, दिनांक १२ जानेवारी सोमवार रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका तरुण शेतकऱ्याचा परिवार उघड्यावर पडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!