बंदाघाट, नांदेड येथे ४७वी गंगा–गोदावरी नदी आरती उत्साहात संपन्न..

नांदेड प्रतिनिधी:-

नांदेड :SNP ग्रुप नांदेड व गोदावरी नदी संसद यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या पौर्णिमेला आयोजित करण्यात येणारी गंगा–गोदावरी नदी आरती आज रविवार, दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी बंदाघाट, नांदेड येथे भक्तिमय वातावरणात पार पडली. ही ४७वी गंगा–गोदावरी नदी आरती होती.


आरतीपूर्वी नांदेड जिल्ह्याचे जलनायक श्री. दीपक मोरताळे यांनी जलप्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने स्वतः तयार केलेले बायो एन्झाईम द्रव्य गोदावरी नदीत प्रवाहित केले. त्यानंतर विधीवत मंत्रोच्चारात गोदावरी नदीची आरती करण्यात आली. पर्यावरण संवर्धन व नदी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.


या कार्यक्रमाचे यजमान म्हणून नांदेड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. सुमितजी मुथा, सौ. खुशबू सुमित मुथा, नगरसेवक सौ. रुची भारतीया, श्री. अल्केश भारतीया व श्री. अरविंदजी भारतीया उपस्थित होते. तसेच SNP ग्रुप नांदेडचे संस्थापक श्री. प्रदीपकुमार जैन, गोदावरी नदी संसदचे संस्थापक श्री. दीपक मोरताळे, संयोजक सौ. चंदा दीदी काबरा, सौ. निशा अग्रवाल, श्री. धीरज साबू, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ. बालाजी पेनूरकर, मराठवाडा विभाग प्रमुख सौ. उज्वला गुरसुडकर, SNP ग्रुपचे श्री. प्रविणकुमार जैन, श्री. निशिगंध लव्हेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


नदी आरतीच्या माध्यमातून गोदावरीच्या पावित्र्याचे जतन, स्वच्छता व पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम शांततामय व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!