नरसिंह विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न


नांदेड़/संपादक गंगाधर गायकवाड

महावीर सोसायटी येथील नरसिंह प्राथमिक,माध्यमिक, व उच्च माध्यमिक विद्यालयात जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड मनपाचे नगरसेवक उमेश चव्हाण, प्राचार्य व्ही. एम. गव्हाणे, मुख्याध्यापिका पवारमॅडम, पर्यवेक्षक कांगणे व्ही. डी. यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पुष्प पूजा करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य,कला, संवाद सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. नरसिंह विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक विभागाने विविध कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. सांस्कृतिक कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग तालुका, जिल्हा पातळीवर नोंदवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन अध्यक्षीय समारोप करतांना शिवाजीराव जाधव यांनी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगरसेवक उमेश चव्हान यांनी शिक्षण महर्षी कै. नागोराव जाधव यांच्या शैक्षणिक कार्याची प्रशंसा करून शाळेत विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या . मुख्याध्यापक गव्हाणे यांनी प्रस्ताविकातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबत माहिती दिली. आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार पंकज आयनेले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!