पळसीकर कन्स्ट्रक्शनचे अवैध मुरूम उत्खनन जोरात

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-

प्रशासन डोळेझाक करणार की कारवाई होणार?
हिमायतनगर तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाचा धंदा सध्या जोरात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. पळसीकर कन्स्ट्रक्शनकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मुरूम उत्खनन करून खुलेआम वाहतूक केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

या अवैध उत्खननात वापरली जाणारी गाडी क्रमांक MH26 CH 2333 असून, ही गाडी मुरूम भरून नियमबाह्यरीत्या रस्त्यावरून वाहतूक करत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. शासनाच्या महसूल नियमांना धाब्यावर बसवून होत असलेल्या या उत्खननामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असून पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे.

विशेष म्हणजे हे सर्व प्रकार सुरू असतानाही महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणा मात्र गप्प का आहेत? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तहसीलदार साहेब सदर गाडी जप्त करून दोषींवर कठोर कारवाई करणार का?

या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार ठेकेदारावर योग्य ते कारवाई करून टिप्पर जप्त करतील का ?
कडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यांचे मनोबल आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!