खनीज पथक प्रमुख बि.एम.चव्हाण मंडळ अधिकारी यांची धाडसी कारवाई; पळसपुर येथे अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

हिमायतनगर देवांनद गुंडेकर


मौजे पळसपुर येथे सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीविरोधात प्रशासनाने धडक कारवाई करत मोठा इशारा दिला आहे. मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. तहसीलदार मॅडम यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी श्री. चव्हाण यांनी धाडसी कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर-टिप्पर रंगेहाथ पकडला.


सदर ट्रॅक्टर पळसपुर परिसरातून बेकायदेशीररीत्या रेती वाहतूक करत असल्याची माहिती मिळताच मंडळ अधिकारी चव्हाण यांनी तात्काळ कारवाई करत सदर वाहन ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.


या कारवाईमुळे अवैध रेती माफियांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाच्या या कठोर भूमिकेचे सर्वसामान्य नागरिकांतून स्वागत होत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे अवैध वाहतुकीविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!