हिमायतनगर महसूल प्रशासनाची धडक कारवाई— वाळूमाफियांचा तराफा जाळून नष्ट..

हिमायतनगर (देवानंद गुंडेकर)

हिमायतनगर तालुक्यात अवैध वाळू उपशाविरोधात प्रशासनाने निर्णायक आणि कडक कारवाई करत वाळूमाफियांना थेट धडा शिकवला आहे. कर्तव्यनिष्ठ तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांच्या आदेशाने आणि कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी बी. एम. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोठा (ज) येथे सायंकाळी ठिक ६:५० वाजता ही ठोस कारवाई राबविण्यात आली.


पैनगंगा नदी पात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी उभारलेला तराफा घटना स्थळीच जाळून पूर्णतः नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध वाळू व्यवसायावर प्रशासनाचा वचक स्पष्टपणे अधोरेखित झाला असून वाळूमाफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.


या कारवाईदरम्यान वाहन चालक आकाश बारकुल, हरीश गिरी कोतवाल तसेच दवणे पोलीस पाटील, कोठा (ज)यांनी प्रशासनास सक्रिय सहकार्य केले.
या नंतर नदी, पर्यावरण व शासन महसूलाची लूट करणाऱ्यांविरोधात पुढेही अशाच कठोर कारवाया केल्या जातील, असा स्पष्ट इशारा तहसील प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!