हिमायतनगर (प्रतिनिधी
हिमायतनगर सरसम बु दरम्यान मार्गावर आज दि.१० शुक्रवार रोजी सायंकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एका व्यक्तीचा नांदेड येथे शासकीय रुग्णालयामध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला.एक गंभीर जखमीवर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सरसम बु. येथील रमेश गुंडेकर, अविनाश गोखले व लखन पंड्या हे तिघे मोटरसायकलने हिमायतनगरहून आपल्या सरसम बु. गावाकडे जात होते. दरम्यान, सरसम–हिमायतनगर मार्गावर एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मोटरसायकलवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले.
या अपघातात लखन पंड्या यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अविनाश गोखले हे नांदेड येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू पावला.तर जखमी रमेश गुंडेकर यांच्यावर नांदेड येथे शासकीय रुग्णालयामध्ये उपचारा सुरू आहेत
घटने नंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली आणि रुग्णवाहिकेद्वारे त्यांना हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
प्राथमिक उपचारानंतर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले . उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू झाला.व एकावर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.हिमायतनगर पोलिस स्टेशन येथे या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हिमायतनगर पोलिसांकडून सुरू आहे.
या अपघातामुळे सरसम नगरीत शोककळा पसरली असून मृत लखन पंड्या व अविनाश गोखले यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
