हदगाव येथे मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


हिमायतनगर : देवानंद गुंडेकर सरसमकर


पशुसंवर्धन विभाग व पंचायत समिती हदगाव/हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजनांविषयी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबिर शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बँकटरमणा हायटेक स्कूल, अंबाळा (नांदेड–हदगाव रोड) येथे होणार आहे.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये पशुपालक व ग्रामीण भागातील इच्छुक लाभार्थींना मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये योजनांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया व ऑनलाइन नोंदणी, विविध लाभ व अनुदान तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
ग्रामीण भागातील युवक, शेतकरी तसेच पशुपालकांना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे, पशुपालन व्यवसायाला चालना देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणे हा या प्रशिक्षण शिबिराचा प्रमुख उद्देश आहे.
“जास्तीत जास्त पशुपालकांना योजनांचा लाभ” मिळावा, यासाठी संबंधितांनी प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहून योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबिराचा पशुपालक, शेतकरी व ग्रामीण भागातील इच्छुक लाभार्थींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!