हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-
हिमायतनगर तालुक्यातील वायवाडी परिसरातील वायवाडी तांडा येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नाली बांधकामाचे काम उच्च दर्जाचे होत आहे. येथील सरपंच बरडे, उपसरपंच मधुकर राठोड तसेच सदस्य शंकर चव्हाण यांच्या पुढाकारातून हे काम नियोजित पद्धतीने पूर्ण करण्यात आले.
या गावात पावसाळ्यात साचणारे पाणी, अस्वच्छता व दुर्गंधी यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र दर्जेदार व मजबूत पद्धतीने करण्यात आलेल्या नाली बांधकामामुळे आता पाणी वहन सुलभ होणार असून स्वच्छता राखण्यास मदत मिळणार आहे.
कामामध्ये गुणवत्तापूर्ण साहित्य, तांत्रिक मापदंड व नियोजन यांचे काटेकोर पालन करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामाबद्दल ग्रामस्थांनी सरपंच बरडे, उपसरपंच मधुकर राठोड, शंकर चव्हाण आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले असून पुढील काळातही असे विकासकाम सुरू राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
