हिमायतनगर नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेसचे‌ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख रफिक सेठ १६७१ मतांनी विजयी

हिमायतनगर प्रतिनिधी :

हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा यश मिळाले असून काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख रफिक सेठ शेख महेबुब यांनी १६७१ मतांच्या प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून फटाक्यांची आतषबाजी व जल्लोष करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.


विरोधकांना मागे टाकत मतदारांनी शेख रफिक सेठ यांच्यावर विश्वास दाखवला आहे. शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा विश्वास शेख रफिक सेठ यांनी व्यक्त केला असून नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाचे देणे विकासकामांद्वारे फेडण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


दरम्यान, मतदान प्रक्रियेदरम्यान शांततामय वातावरणात निवडणूक पार पडली. नगराध्यक्ष पदाच्या विजयामुळे हिमायतनगरमध्ये राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा बदल घडल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!