शंकरसिंह ठाकूर यांना ‘जनभूषण राष्ट्रीय पुरस्कार.

नांदेड प्रतिनिधी:

नांदेड जिल्ह्यातील प्रखर तडफदार व्यक्तिमत्व असलेले दैनिक वीर शिरोमणी मुख्य संपादक शंकरसिंह ठाकूर यांची मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी पाहता जीवनसाधना फाऊंडेशन व जीवन सुरक्षा हेल्थ केअर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष तथा दैनिक ‘वीर शिरोमणी’चे मुख्य संपादक शंकरसिंह ठाकूर यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘जनभूषण राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम रविवारी दि. २१ डिसेंबर रोजी विवेकनगर येथील शिवस्वराज्य प्रतिष्ठाण निवासी गुरुकुलात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण देशटवार होते. प्रारंभी पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वक्तृत्व स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या १५ वर्षांपासून सामाजिक जाणिवेतून कार्य करणाऱ्या शंकरसिंह ठाकूर यांच्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!