मौजे सरसम (बु.) येथे बिबट्याच्या हल्लात हरिण ठार ; परिसरात भीतीचे वातावरण..


हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम (बु.) येथील शेती शिवारात २९ डिसेंबरच्या मध्यरात्री बिबट्याने हरणाची शिकार केल्याची घटना घडली. हिमायतनगर तालुक्यामध्ये बिबट्याचे अनेक घटना घडत असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यासाठी जाणे धोकादायक झाले आहे.

या घटनेची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाला कळविल्यानंतर आज दि ३० डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

मंगेश पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी हिमायतनगर डी.डी. विभुते वनपाल सरसम विकास कांबळे वन मजूर यांच्या नेतृत्वाखाली पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी तपास करून संबंधित कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. या परिसरात बिबट्याची वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून परिसरात वन विभागाने गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!