बोरगडी व टेभी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत चित्रीकरण संपन्न..

हिमायतनगर:- देवानंद गुंडेकर

महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत असून, या अभियानाअंतर्गत दि. २२ जानेवारी रोजी बोरगडी व टेभी येथे विकासकामांचे चित्रीकरण करण्यात आले.

या अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांद्वारे गावाचा विकास कशा पद्धतीने होत आहे,याचा आढावा शासनाच्या वतीने आलेल्या अधिकाऱ्यांनी घेतला. स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा तसेच इतर मूलभूत सुविधांच्या माध्यमातून ग्रामीण भागात घडणाऱ्या विकासकामांची माहिती प्रत्यक्ष पाहणी करून चित्रीकरण करण्यात आले.

यावेळी सरपंच चंद्रभागाबाई काईतवाड, उपसरपंच विलास चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य कैलास राठोड, पंचायत समिती विस्तार अधिकारी सुशीलकुमार शिंदे,ग्रामसेवक बोधनकर, तसेच ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंडेकर, संपादक देवानंद गुंडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे ग्रामीण भागातील विकासाला गती मिळत असून, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!