खनिज पथक प्रमुख बि.एम. चव्हाण मंडळ अधिकारी यांची धाडसी कारवाई;पळसपुर येथे अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त..

हिमायतनगर देवांनद गुंडेकर

हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपूर येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कठोर कारवाई करत संबंधित वाहन जप्त केले आहे.
मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. पल्लवी टेमकर तहसीलदार मॅडम यांच्या आदेशाने खनिज पथक प्रमुख चव्हाण यांनी ही पथकासह धाडसी कारवाई केली.

मंडळ अधिकारी चव्हाण यांनी केलेली ही पहिलीच कारवाई नसून या अगोदर मागील काळामध्ये अशा प्रकारच्या अनेक कारवाया केलेले आहे. त्यामध्ये चार दिवसांपूर्वी 4 फेब्रुवारीला अशाच प्रकारची कारवाई केली होती. त्यामुळे पथक प्रमुख चव्हाण हे निष्ठावान, कार्यक्षम अधिकारी असल्याचे दिसून येतात.


अवैधरीत्या रेती वाहतूक करत असलेले ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.सदर कारवाई मा. तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिज पथक प्रमुख बी. एम. चव्हाण (मंडळ अधिकारी) यांनी केली.


कारवाईदरम्यान ग्राम महसूल अधिकारी अभिजित भरणे, आकाश बारकुल, वाहन चालक महसूल सेवक योगेश आलेवाड व गजानन आडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.


तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने घेतलेल्या या ठोस भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत असून, पुढील काळातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!