हिमायतनगर तहसील अंतर्गत 18 फेब्रुवारी ते 15 मे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन..

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:-

हिमायतनगर तहसील अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर हे 18 फेब्रुवारी 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्देश महसूल विभागाशी संबंधित ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या दैनंदिन समस्या क्षेत्रीय पातळीवरच तत्काळ निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करणे हा आहे.
या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार
18 फेब्रुवारी ते 5 मार्च : मंडळ स्तरावर पूर्ण तयारी
7 मार्च ते 14 मार्च : तालुक्यातील मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन
10 एप्रिल ते 17 एप्रिल : तालुक्यातील मंडळ स्थळावर शिबिरांचे आयोजन
8 मे ते 15 मे : नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर शिबिरांचे आयोजन
या शिबिरांमध्ये पुढील महत्त्वाच्या कामकाजांची अंमलबजावणी केली जाणार आहे.भोगवटदार वर्ग दोन जमिनी भोगवटदार वर्ग एकमध्ये प्रवर्गित करणे
जीवन सातबारा मोहिमेंतर्गत सर्व गावांमध्ये सातबारा अद्ययावत करून प्रलंबित नोंदी निकाली काढणे
सामाजिक अर्थसहाय्य योजना मंजूर करून आदेश देणे,तुकडेबंदी कायद्यांतर्गत सातबारा नोंदींमध्ये खरेदीदारांची नावे व नव्या अर्जांवरील फेरफार/शेरे घेणे,विद्यार्थ्यांचे विविध दाखले वाटप, पांदण रस्ते आदेशीत करणे,प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा
अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क लोकसेवा हक्क कायद्यानुसार तात्काळ सेवा
अकृषक तरतुदीं संदर्भातील सुधारणा व मार्गदर्शन
या संधीचा लाभ घेऊन आपापल्या महसूलविषयक तक्रारी व प्रश्न शिबिरात मांडावेत, असे आवाहन तहसीलदार मॅडम पल्लवी टेमकर यांनी हिमायतनगर तालुक्यातील सर्व जनतेस केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!