हिमायतनगर:- देवानंद गुंडेकर सरसमकर
हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेभी येथे काल दि. 4/3/2025 रोजी रात्री उशिरा स्वतः तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांनी भेट देत सरसम मंडळ येथे होणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’बाबत व्यापक प्रसिद्धी केली. नागरिकांनी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे थेट आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.
या अचानक रात्रीच्या भेटीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराबाबत माहिती घेतली. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून तहसीलदार मॅडम यांनी समाधान व्यक्त केले.ग्रामस्थांनी रात्री गावात येऊन प्रत्यक्ष संवाद साधल्याबद्दल तहसीलदार मॅडम यांचे अभिनंदन केले. प्रशासन नागरिकांपर्यंत थेट पोहोचत असल्याचे समाधानही व्यक्त करण्यात आले.
या भेटीदरम्यान मंडळ अधिकारी बी.एम. चव्हाण हे ही उपस्थित होते. त्यांनी शिबिरात उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देत नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले.सरसम मंडळ येथे होणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर’ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
