रमजान ईद निमित्त किनवटमध्ये आ. भीमराव केराम यांची सदिच्छा भेट; सामाजिक ऐक्याचा संदेश

किनवट विशेष प्रतिनिधी: शेख मोईन

पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने किनवट शहरात सामाजिक सलोख्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. या शुभ प्रसंगी लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम यांनी शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख मुर्तुजा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.


या भेटीदरम्यान परस्पर सन्मान, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. “विविधतेत एकता” ही भारतीय संस्कृतीची खरी ओळख असून, अशा सदिच्छा भेटींमुळे समाजातील सलोखा अधिक दृढ होतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


कार्यक्रमास नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिनकरजी दहिफळे, माजी नगराध्यक्ष आनंदजी मच्छेवार तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बालाजी बामणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


या सदिच्छा भेटीमुळे किनवट शहरात एकोपा, परस्पर विश्वास आणि सामाजिक ऐक्याचा संदेश अधिक बळकट झाला असून, नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!