मौजे सरसम बु. येथील बेजबाबदार ग्रामसेवक यांना निलंबित करा… 👉देवानंद गुंडेकर सरसमकर यांची निवेदनाद्वारे मागणी

हिमायतनगर प्रतिनिधी : गंगाधर गायकवाड दिघीकर

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु., ता. हिमायतनगर, जि. नांदेड येथील ग्रामसेवक अधिकारी कैलास डुडळे हे मुख्यालयी राहत नसल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात पंचायत समिती प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी तक्रारदार देवानंद गुंडेकर सरसमकर यांनी केली आहे.

तक्रारीनुसार, ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील विविध कामांमध्ये अडथळे निर्माण होत तसेच त्यांना फोन केला असता ते अभद्र भाषेत बोलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


तसेच ग्रामपंचायत कार्यालयात अधिकारी नियमितपणे उपलब्ध नसल्यामुळे दाखले, शासकीय योजना तसेच ग्रामपंचायत प्रशासनाशी संबंधित विविध कामे वेळेत होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. नागरिकांच्या तक्रारींचेही वेळेवर निवारण होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित ग्रामसेवकांवर योग्य प्रशासकीय कारवाई द्वारे निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा संविधानिक मार्गाने अमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!