पळसपुरात कृषी क्रांतीचे पाऊल : शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी: गंगाधर गायकवाड दिघीकर

हिमायतनगर. तालुक्यातील मौजे पळसपूर येथे कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड व ‘आत्मा ‘ कृषी विभाग तर्फे पी आर ए सर्वेक्षण,खरीप पूर्व मेळावा संपन्न

हिमायतनगर. तालुक्यातील पळसपुर या कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी अंतर्गत दत्तक गावात शनिवारी दि १ जून रोजी कृषी क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी (नांदेड-१) आणि ‘आत्मा’ कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने गावात एकाच दिवशी दोन महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘सहभागी ग्रामीण मूल्यमापन सर्वेक्षण’ (PRA Survey) ने झाली. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. देविकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विस्तार तज्ञ डॉ. अमिता क्षत्रिय यांनी गावातील शेतकरी, महिला बचत गट व युवकांशी गटचर्चा करून थेट संवाद साधला. यावेळी गावाचा नकाशा, हंगामवार पीक पद्धती, पाणी व जमिनीची उपलब्धता आणि हुमणी, पाणीटंचाई, कीटकनाशकांचा अतिवापर या प्रमुख अडचणींची सखोल माहिती संकलित करण्यात आली.
“PRA सर्वेक्षण हा केवळ डेटा गोळा करण्याचा कार्यक्रम नाही.हा गावकऱ्यांच्या सहभागातून गावाचा पुढील ५ वर्षांचा शाश्वत कृषी विकास आराखडा बनवण्याचा पाया आहे. शास्त्रज्ञ व शेतकरी एकत्र आले तर बदल निश्चित आहे.” असे प्रतिपादन डॉ.देशमुख यांनी केले.दुपारच्या सत्रात ‘खरीप पूर्व शेतकरी मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शास्त्रज्ञांनी बदलत्या हवामानातील शेतीच्या आव्हानांवर मोलाचे मार्गदर्शन केले. माती परीक्षणाशिवाय खते देणे म्हणजे आंधळ्याने नेम धरण्यासारखे आहे. संतुलित खत वापरातून उत्पादन खर्च २० टक्के कमी करता येतो.असे प्रतिपादन प्रा.संदीप जायभाये (कृषि विद्या तज्ञ) यांनी केले.
या कार्यक्रमात कृषी विभाग हिमायतनगर यांचा मोलाचा सहभाग होता. त्यामध्ये . तालुका कृषी अधिकारी के एम सिडाम, मंडळ कृषी अधिकारी एम एस काळे, निलेश आर वानखेडे तसेच कृषी सहायक अधिकारी सुदर्शन माने,अदिल चाचणी, गुहाटे,पोखरा साहाय्यक साईनाथ अन्नछत्रे यांचे या कार्यक्रमाला मोलाचं सहकार्य लाभले. कृषी सहायक अधिकारी हनुमंत नंदनवार व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असणारे कृषी मिञ कल्याण वानखेडे,दिगांबर वानखेडे, गजानन देवसरकर तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नागोरावजी शिंदे, पळसपुरकर नगरीचे सरपंच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ गंगाबाई मांजरे,ग्रामसेवक आर एस गोणेवार,कृषीसखी वंदनाबाई बालाजी वानखेडे,सतीश वाडेकर,माधवराव सुकळकर,दत्ता बोंबीलवार, सदाशिव वानखेडे, गजानन वानखेडे,शिवकन्या दत्ता कोमलवार यांच्यासह शेतकरी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यंदा अल निनो सक्रिय असल्याने पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. अशा वेळी कमी पाण्यात येणाऱ्या वाणांची निवड व पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे ठरेल. त्याच बरोबर अति रासायनिक खते किटकनाशके वापरा मुळे कॅन्सर या रोगांचे थैमान वाढत आहे.यामुळे आजच आपण जैविक नैसर्गिक व सेंद्रिय शेती नाही केली तर येणारा काळ खूप बिकट आणि अनेक रोगांचा येईल घरोघरी कॅन्सर रोगी असेल म्हणून आज वेळ आहे शेती माती आणि आरोग्य वाचवण्याच – डॉ.देविकांत देशमुख, शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी
हुमणी व बोंडअळीच्या समूळ नायनाटासाठी सामूहिक प्रकाश सापळे हाच सर्वात प्रभावी व कमी खर्चाचा उपाय आहे. एकट्याने नव्हे, तर संपूर्ण गावाने मोहीम राबवावी.शेतीसाठी जैविक सेंद्रिय शेती अवलंब करावा दशपर्णी माहिती खुप विस्तृत दिली आणि शेतकऱ्यांसी चर्चा द्वारे शंकाचे निरसन केले.गांडूळ खत,कंपोस्ट खत,जोर खत,हिरवळीची खते,शेणखत कुजून प्रक्रिया करून शेतात टाकावे.या शिवाय शेती म्हणजे निर्जीव वस्तू आहे दगड आहे ति जिवंत करण्यासाठी जैविक व नैसर्गिक पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे..
-प्रा.माणिक कल्याणकर (पीक संरक्षण तज्ञ
शेती विस्तार विषय माहिती दिली. महिला आणि पुरुषांनी प्रक्रिया उद्योगातही यावे आणि नवीन तंत्रज्ञान वापर करून शेती आणि शेतीपूरक उद्योग उभारावे तसेच रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीत कार्बन कमी मोठ्या प्रमाणात होत आहे. ‘खेती बचाव अभियान’ अंतर्गत जैविक पद्धती व महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!