हिमायतनगर तालुका प्रतिनिधी :- गंगाधर गायकवाड दिघीकर
हिमायतनगर तालुक्यातील. संजय गांधी
निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, दिव्यांग व अन्य विविध योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी दरमहा मिळणारे अनुदान चालू ठेवण्यासाठी तात्काळ ऑनलाईन हयात प्रमाणपत्र सादर करावे. असे आवाहन हिमायतनगर च्या तहसीलदार सौ पल्लवी टेमकर , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांनी केले आहे. विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचे संगणक प्रणालीद्वारे हयात प्रमाणपत्र तात्काळ सादर करावे. केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र बीएसए या प्रणालीद्वारे सहजरित्या लाभ घेणे शक्य होत आहे.
यामुळे वेळेची बचत होऊन लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्रासाठी होणारे हेलपाटे वाचतात. राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थी वृध्द, विधवा, निराधार पुरुष-महिला, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती यांनी बँक/पोस्ट ऑफिस/तहसिल कार्यालय येथे जाऊन हयात प्रमाणपत्र ऑफलाईनरित्या सादर करतात. त्यामुळे सदर योजनेतील लाभार्थी यांना विहीत कालावधीत हयात प्रमाणपत्र सादर करणे शक्य होत नाही. परिणामी, सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यापासून वंचित रहावे लागते.
केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील पात्र लाभार्थ्यांकरिता बीएसए या प्रणालीचा वापर करुन हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास याद्वारे शासनाने मान्यता दिलेली आहे. विशेष सहाय्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांना स्वतः मोबाईल उपलब्ध असल्यास इतर कोणत्याही नातेवाईकामार्फत अथवा शेतु केंद्रांवर जाऊन करा व असे आवाहन हिमायतनगर तहसीलदार सौ पल्लवीताई टेमकर यांनी केले आहे.
