अनुसूचित जाती शासकीय निवासी मुलींची शाळा मरसूळ येथे प्रवेशोत्सव उत्साहात

उमरखेड तालुका प्रतिनिधी:-

उमरखेड तालुक्यातील मौजे मरसूळ येथील अनुसूचित जाती शासकीय मुलींची निवासी शाळा मरसूळ येथे आज, ३० जून २०२६ रोजी, शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सर्व विद्यार्थिनींचे आणि नव्याने प्रवेश केलेल्या मुलींचे पुष्पगुच्छ व शाळेच्या साहित्याने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमती बोरकर मॅडम यांची उपस्थिती होती,

तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, प्रमुख पाहुणे म्हणून सौ. इंदुताई कुरकटे, गंगाधर गायकवाड, कपिल आडागळे, गणपत गाडेकर, राऊत सर, आडे सर, तसेच सर्व पालक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

सूत्रसंचालन ए.पी. साबळे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन बरडे सर यांनी केले.अनु.जाती मुलींची शासकीय निवासी शाळा मरसूळ, सर्व शिक्षक, शिक्षिकांचा, शाळा व्यवस्थापन समितीचा व सर्व कर्मचाऱ्यांचा वतीने, इयत्ता ७, ८, ९, १० च्या सर्व विद्यार्थिनींचे, तसेच विशेष इयत्ता ६ मध्ये नव्याने आलेल्या सर्व विद्यार्थिनींचे स्वागत करून, पुढील अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!