पैनगंगा नदीपासून ते डोल्हारी पर्यत रस्ता सिमेंट काँक्रींट तयार करूण द्यावा ; संतोष पाटील डोल्हारीकर यांची मागणी.

हिमायतनगर :- गंगाधर गायकवाड दिघीकर

हिमायतनगर. पैनगंगा नदीपासून ते डोल्हारी, सिरपल्ली फाटा या अंतर्गत रस्त्याचे सिमेंट्रीकरण करूण रस्ता रहदारीसाठी उपयूक्त करूण द्यावा. अशी मागणी जेष्ठ शिवसैनिक संतोष पाटील कदम डोल्हारीकर, नागोराव शिंदे पळसपूरकर यांनी केली आहे.
सार्वजानिक बांधकाम उपविभाग हिमायतनगर या कार्यालयाला दिलेल्या निवेदनात शिंदे,कदम यांनी म्हटले आहे की, सिरपल्ली फाटा,डोल्हारी हा रस्ता प्र.जि.मा. १०८ मध्ये घेतलेला आहे. व तसेच अप्रोच रस्ता मात्र आपल्या खात्याच्या नकाशावरून इजिमा १४ दाखविलेला आहे.

परंतू त्याला लागून असलेला पैनगंगा नदीपासून सिरपल्ली फाट्या पर्यत अप्रोच रस्ता म्हणून घेणे अत्यंत गरजेचा आहे. आणि हा रस्ता पुरबाधीत असल्याने सिमेंट काँक्रीट मध्ये कमीतकमी सात मिटरचा करावा लागतो, कारण आमनेसामने दोन वाहणे पास होत नाहीत.व तसेच अप्रोच रस्ता दोन पाॅईट ५०० की.मी. लांबीचा आहे.प्रजीमा.१०८ ला पूरक रस्ता म्हणून जोडण्यात येवून एमडीआर मध्ये समाविष्ट करावा, या रस्त्याने रेल्वे प्रवाशी ढाणकी विभागातील गांजेगाव या रस्त्यावर ढाणकी जवळ स्नेहा गोल्ड कंपनी ( सोयाबीन ) अस्तित्वात आली आहे.

तसेच या विभागातील आदिवाशी दुर्गम, डोंगराळ भागातील जनतेच्या व्यापारी, शाळकरी मुले, शेतकरी, मुंबई, हैद्राबाद, आदिलाबाद, नागपूर, नांदेड, अकोला, अमरावती या शहराला यानात्या कारणाने संबंध येत असतो.तेंव्हा या दोन पाॅईट पाच किमी. रस्त्याची दर्जेदारन्नोत्ती करूण देण्यात यावे. अशी मागणी ही संतोष पाटील कदम डोल्हारीकर,नागोराव शिंदे पळसपूरकर, विठ्ठलराव गायकवाड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!