सेवा प्रसूतीगृह व सोनोग्राफी सेंटरच्या चौथा वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

हिमायतनगर | देवानंद गुंडेकर सरसमकर

हिमायतनगर शहरातील सेवा प्रसूतीगृह व सोनोग्राफी सेंटर अँड डिजिटल एक्स-रे यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि. २५, २६ व २७ जुलै २०२६ रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया (ऑपरेशन) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ हिमायतनगर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या तीन दिवसीय शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व सल्ला दिला जाणार असून विविध तपासण्यांवर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे व इतर आवश्यक तपासण्या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे करण्यात येणार आहेत. केंद्रात नव्याने अत्याधुनिक DR System X-ray Machine उपलब्ध करून देण्यात आल्याने रुग्णांना अधिक दर्जेदार व जलद सेवा मिळणार आहे.
शिबिरात स्त्रीरोग, प्रसूती, गर्भधारणा, वंध्यत्व उपचार, विविध प्रकारच्या सोनोग्राफी, सामान्य शस्त्रक्रिया, हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स, स्तनातील गाठी, गर्भपिशवीवरील शस्त्रक्रिया, सिझेरियन तसेच इतर आवश्यक शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहेत. याशिवाय गर्भवती महिलांची तपासणी, नॉर्मल डिलिव्हरीबाबत मार्गदर्शन, कुटुंब नियोजन सल्ला आणि महिलांच्या विविध आजारांवर विशेष सल्लाही दिला जाणार आहे.
या शिबिरासाठी डॉ. विकास प्रकाशराव वानखेडे पळसपुरकर (रेडिओलॉजिस्ट), डॉ. शिल्पा जाधव बनखेडे (स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ), डॉ. नितीन आकोमवार (जनरल सर्जन), डॉ. प्रदीप चव्हाण (फिजिशियन), डॉ. भरके (भूल रोग तज्ज्ञ) आणि डॉ. रामेश्वर भाले (भूलतज्ज्ञ) यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे.
शिबिरातील लाभ घेण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून तपासणीची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी राहणार आहे. अधिक माहितीसाठी मो. ९११२७७५२८२ वर संपर्क साधावा, असे आवाहन सेवा प्रसूतीगृह व सोनोग्राफी सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे.
आरोग्यविषयक दर्जेदार सेवा सर्वसामान्यांपर्यंत सवलतीच्या दरात पोहोचाव्यात या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!