मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर हिमायतनगरमध्ये यशस्वी

हिमायतनगर:- देवानंद गुंडेकर सरसमकर

हिमायतनगर, २४ जुलै २०२६: उपजिल्हा रुग्णालय हिमायतनगर येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या, आरएमओ डॉ. राजाभाऊ बुट्टे, तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विकास वानखेडे यांचे मार्गदर्शनाखाली हा शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन मा. डॉ. राजेंद्र वानखेडे नगरसेवक, नगरपंचायत अध्यक्ष व डॉ. असोसिएशन अध्यक्ष, तसेच मा. सरदार खान पठाण (नगरसेवक), मा. आशिषभाऊ सकवान (नगरसेवक), मा. रामभाऊ सूर्यवंशी, मा. वामनराव पाटील मीरासे, संतोष मुद्धेवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी शिबिरात आलेल्या सर्व रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांनी बी.पी., शुगर, एच.बी., ईसीजी तपासण्या करून योग्य उपचार व औषधी वाटप केले. या शिबिरात डॉ. वाकोडे, डॉ. वाळके, डॉ. वागतकर, डॉ. गाढे, डॉ. देशमुख मॅडम, डॉ. मामीडवार मॅडम, डॉ. मुनेश्वर मॅडम, डॉ. सदावर्ते सर, परिसेविका सय्यद खमर मॅडम, श्री सिनकर सर आणि सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले, ज्यामुळे शिबिर यशस्वी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!